बेंगळुरू | देशभरात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. यामुळे पतंप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवला आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील नागरिकांनी गर्दी टाळा आणि सोशल डिस्टन्सिंग पालन करा, असे आवाहन मोदी आणि राज्य सरकारकडून केले जात आहे. त्यामुळे एका बाजुला देशभरातील अनेक सामूहिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचे आज (१७ एप्रिल) लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी अनेक व्हीव्हीआयपींनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले आहे.
#WATCH Karnataka: Nikhil Kumarswamy, son of former Karnataka CM HD Kumaraswamy, tied the knot with Revathi, the grand-niece of former Congress Minister for Housing M Krishnappa, today in Ramnagar. (Video source: anonymous wedding guest) pic.twitter.com/5DH9fjNshQ
— ANI (@ANI) April 17, 2020
एचडी कुमारस्वामींचा मुलगा निखिल यांचा लग्न सोहळा हा रामनगर जिल्ह्यातील एका फार्म हाऊसवर पार पाडला. या लग्नासाठी राज्य सरकारकडून परवानगी देण्यता आल्याची माहिती कुमारस्वामी यांनी सांगितले आहे. कुमारस्वामींच्या मुलाच्या लग्न सोहळ्यासाठी कर्नाटक सरकारकडून परवानगी देण्यात आली असून या सोहळ्यासाठी फक्त २१ कारना परवानगी दिली गेल्याची माहिती मिळाली आहे.
Karnataka: Nikhil Kumarswamy, son of former Karnataka CM HD Kumaraswamy, tied the knot with Revathi, the grand-niece of former Congress Minister for Housing M Krishnappa, today in Bengaluru. pic.twitter.com/HrLpGD5s9p
— ANI (@ANI) April 17, 2020
या लग्नसोहळ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. निखिल याचे लग्न काँग्रेसचे वरिष्ठ नेते एम कृष्णाप्पा यांच्या मुलीसोबत करण्यात आले आहे. दोघांचा साखरपुडा १० फेब्रुवारीला झाला होता. लॉकडाऊन असले तरीही लग्न पुढे ढकलण्यात आलेले नाही. “मी रामनगरच्या उपायुक्तांकडे अहवाल मागवला आहे, पोलिस अधीक्षकांशीही बोलत आहे. आम्हाला कारवाई करावीच लागेल. अन्यथा ही यंत्रणेची संपूर्ण चेष्टा होईल, यासंदर्भातील रामनगरचे उपायुक्तांकडे रिपोर्ट मागवण्यात आला आहे,” अशी माहिती कर्नाटकटे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वनाथनाराण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
I have sought a report from Ramnagar Deputy Commissioner. I will speak to the Superintendent of Police, we need to take action otherwise it will be a complete mockery of the system: CN Ashwathnarayan, Karnataka Deputy Chief Minister https://t.co/N8OVxxq3Gt pic.twitter.com/WGl8ZLATZw
— ANI (@ANI) April 17, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.