नवी दिल्ली | काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितल्याचा दावा केला आहे. यावरून देशाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज (२३ जुलै) मोठा गोंधळ झाला. यावर राज्यसभेत स्पष्टी करत देताना देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष यांना काश्मीरप्रश्नी विनंती केली नव्हती. तसेच काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असून यावर कोणतीह चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले”
External Affairs Minister S Jaishankar in Rajya Sabha: It has been India’s consistent position that all outstanding issues with Pakistan are discussed only bilaterally. Any engagement with Pakistan would require an end to cross-border terrorism. https://t.co/TjyYot4q5t
— ANI (@ANI) July 23, 2019
” पाकिस्तानसोबत कोणत्याही मुद्दयावर चर्चा होऊ शकते. मात्र, त्यांच्याकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे. शिमला आणि लाहोर समझौता ज्याप्रकारे झाला. त्याचप्रकारे पाकिस्तानसोबत प्रत्येक मुद्दा द्विपक्षीय चर्चेने सोडविला जाऊ शकतो, ” असेही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
External Affairs Minister S Jaishankar in Rajya Sabha: The Shimla Agreement & the Lahore declaration provide the basis to resolve all issues between India & Pakistan bilaterally. pic.twitter.com/gg1ZH2Evzz
— ANI (@ANI) July 23, 2019
“दोन आठवड्यांपूर्वीच नरेंद्र मोदींशी माझी चर्चा झाली. त्यांनी मला विचारे होते की ‘तुम्ही मध्यस्थ होणार का?’ मी विचारले, ‘कुठे?’ तर ते म्हणाले, ‘काश्मीर प्रश्नी’.”मी म्हणालो, जर माझी काही मदत होणार असेल तर मला नक्कीच आनंद होईल,” असा दावा ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. इम्रान सध्या ३ दिवसाच्या दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि इम्रान यांची भेट झाली, त्यावेळी ट्रम्प म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.