तिरुवनंतपुरम | केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.
त्यापुर्वी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांचाशी झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळला पुराचा फटका बसल्यामुळे ५०० कोटीं रुपयांची मदत जाहीर केली आहे. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
#WATCH: Prime Minister Narendra Modi conducts an aerial survey of flood affected areas. PM has announced an ex-gratia of Rs. 2 lakh per person to the next kin of the deceased and Rs.50,000 to those seriously injured, from PM’s National Relief Funds (PMNRF). #KeralaFloods pic.twitter.com/T6FYNVLmMu
— ANI (@ANI) August 18, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.