तिरुवनंतपुरम | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (८ जून) केरळचा दौरा करून तेथील जनतेचे आभार मानले. केरळ माझ्यासाठी वाराणसी ऐवढेच महत्त्वाचे असल्याचे मोदी म्हणाले. पुढे मोदी असे देखील म्हटले की, ज्यांनी आम्हला निवडून दिले ते आमचे आहेत, आणि ज्यांनी आम्हाला निवडून दिले नाही. देखील आमचेच असल्याचे केरळच्या सभेत संबोधिक करताना म्हणाले.
PM Narendra Modi: We believe that elections have a place of their own but after elections the more important responsibility is towards the 130 crore citizens. Those who made us win our ours, those who did not make us win are also ours. Kerala is as much mine as is Varanasi. https://t.co/KgSKCuJWT0
— ANI (@ANI) June 8, 2019
मोदी हे आज सकाळी केरळमध्ये दाखल झाले. त्यानंतर मोदींनी गुरुवायूर येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात पूजा केली. यावेळी मोदींची पद्मतुला करण्यात आली. त्यानंतर सभेला संबोधित करताना मोदींनी केरळमधील जनतेचे आभार मानले. आम्ही भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीच्या राजकारणासाठी मैदानात उतरत नाही. आम्ही ३६५ दिवस जनतेच्या सेवेमध्ये व्यस्त असतो. आम्ही केवळ सरकार स्थापन करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. आम्ही देश घडवण्यासाठी राजकारणात उतरलो आहोत. जनता आम्हाला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी बनवते. मात्र आम्ही जनसेवक आहोत, जनप्रतिनिधी आजीवन असतात, असेही मोदींनी सांगितले.
PM Narendra Modi in Guruvayur, Kerala: People choose their 'jan pratinidhi' for 5 years but we are 'jan sevak' who is committed to serving the people, life long. https://t.co/WYsj0vHCyy
— ANI (@ANI) June 8, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.