HW News Marathi
देश / विदेश

राज्यात ‘कोरोना’बाधितांचा आकडा १००० पार, एकट्या मुंबईत ११६ नवे रुग्ण

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १००० च्या पार गेला आहे. गेल्या केवळ २४ तासांमध्ये राज्यातील आकड्यात तब्बल १५० ने वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १०१८ वर जाऊन पोहोचला आहे. चिंताजनक बाब म्हणजे एकट्या मुंबईत फक्त गेल्या २४ तासांत ११६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मुंबईतील एकूण आकडा ५९० वर पोहोचला आहे. या ५९० पैकी २० जण पूर्ण बरे झाले असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, राज्यासाठी आणि विशेषतः मुंबईसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल १५० नवे कोरोना रुग्ण

मुंबई 116

पुणे 18

अहमदनगर 3

बुलढाणा 2

ठाणे मंडळ 2

नागपूर 3

सातारा 1

औरंगाबाद 3

रत्नागिरी 1

सांगली 1

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

102 व्या घटनादुरुस्तीत बदल करणारे विधेयक आज लोकसभेत मांडलं!

News Desk

पंजाबी सुप्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या

Aprna

मेट्रो सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार

News Desk