HW News Marathi
देश / विदेश

ब्रिटनच्या राजपुत्र प्रिन्स हॅरीचा शाही विवाह सोहळा

लंडन | हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्केल व ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आज विवाहबंधनात अडकणार आहेत. ब्रिटन मधील विंडसर कॅसलमधील सेंट चार्ज चॅपल चर्चमध्ये मेगन व प्रिन्स हॅरी यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मेगन मार्कलचे वडील थॉमल मार्केल आजारी असल्याने लग्नाला हजर राहणार नाहीत. म्हणून प्रिन्स चार्ल्स मेगनला चर्चपर्यंत घेऊन जाणार आहेत.

मेगन व प्रिन्स हॅरी यांच्या शाही विवाहामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते आहे. लग्नासाठी एक लाखांहून जास्त लोक विंडसर कॅसलमध्ये पोहोचले आहेत. या ठिकाणी सुरक्षेसाठी कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पोलीस, गुप्तचर अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांवर शाही जोडीला संरक्षण पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

३३ वर्षीय प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट जुलै २०१६ मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. काही महिन्यांपूर्वीच हॅरीने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, तो मेगनने मान्य केला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मेगन व प्रिन्स हॅरी यांनी साखरपुडा केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष NDA मधून बाहेर भाजपला धक्का

News Desk

हरियाणाच्या सुषमा स्वराज यांची रंजक प्रेम कहाणी

News Desk

Kulbhushan Jadhav : दुसऱ्यांदा काउन्सलर अ‍ॅक्सेसला पाकचा नकार, भारत आयसीजेमध्ये जाणार

News Desk