HW News Marathi
देश / विदेश

हरियाणाच्या सुषमा स्वराज यांची रंजक प्रेम कहाणी

नवी दिल्ली | माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे काल (६ ऑगस्ट) हृदयविकाराने निधन झाले. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी दिल्ली येथील एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांच्या अचानक जाणे देशवासीयांना चटका लावून जाणारे आहे. यांच्या निधानाने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुषमा स्वराज यांचे राजकीय कारकीर्त जितकी धडाकेबाज होती. त्याचप्रमाणे त्यांची प्रेमकहाणी देखील तितकीच रंजक होती.

सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. त्यांनी घरच्यांचा विरोध असतानाही त्यांनी मिझोरमचे माजी राज्यपाल आणि वकिल स्वराज कौशल यांच्यासोबत विवाह केला. पंजाब विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या चंदीगडमधील लॉ कॉलेजमध्ये पहिल्यांदाच सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांची भेट झाली. यानंतर या दोघांमध्ये हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण दोन्ही घराच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. बऱ्याच प्रयत्नांनी त्यांनी आपल्या घरच्यांची या लग्नासाठी समजूत काढून परवाणगी मिळवली. त्या स्वराज कौशल यांच्या विवाह करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्या असून त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना विवाहासाठी परवाणगी मिळवली. यानंतर १३ जुलै १९७५ मध्ये दोघांचा विवाह संपन्न झाला. तसेच यामध्ये महत्वाची बाब म्हणजे सुषमा स्वराज यांनी आपल्या पतीचे नावालाच आडनाव बनविण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

सुषमा यांचे पती स्वराज हे सर्वोच्च न्यायलयात प्रतिष्ठीत वकील आहेत. स्वराज यांना वयाच्या ३४ व्या वर्षी ॲडव्होकेट जनरल पदावर नियुक्त करण्यात आले होते. ते सर्वात कमी वयाचे ॲडव्होकेट जनरल ठरले. तर वयाच्या ३७ व्या वर्षी ते मिझोरामचे राज्यपाल झाले. त्यांनी १९९० ते १९९३ या तीन वर्षांसाठी राज्यपाल पद भूषवले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुरुग्राम : गोळीबार करणारा सुरक्षारक्षक पोलिसांच्या ताब्यात

News Desk

मोदींना ‘चिनी खुळखुळे’ भेट, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अनोखे आंदोलन

News Desk

गॅसदरवाढीवरून राज्यसभेत गदारोळ

News Desk