HW Marathi
देश / विदेश

जाणून घ्या… गुरूपौर्णिमेचे महत्व

गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु,

गुरुर देवो महेश्वर:….. गुरु साक्षात परब्रह्मा,

तस्मै श्री गुरुवे नम:

गुरुपौर्णिर्मेचा उत्‍सव आज (१६ जुलै) देशभरात साजरा करण्यात येत आहे. देशभरातील शाळा, कॉलेजेसमध्येही गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. प्रत्येक जण आपल्या गुरूंना वंदन केले जाते. परंतु अनेकांना गुरूपौर्णिमेचे महत्व माहीत नसते. त्यामुळे आज गुरूपौर्णिमेचे महत्व आपण जाणून घेऊ.

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा सुद्धा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी श्रद्धा आहे. या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे, असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. या श्रध्देने संन्यासी मंडळी शंकराचार्यांचाही या दिवशी पूजा करतात. याच दिवशी दिक्षागुरू, माता, पित्याचीही पूजा करण्याची पद्धत आहे.

आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली आहे.

गुरू पौर्णिमेच्या दिवशी गुरूकडे जाऊन त्यांना वंदन करावे. त्यांची पूजा करून त्यांचात्यांचा आशीर्वाद घ्यावा. गरुना आपल्या जीवनामध्ये मदत कार्य करण्याची प्रतिज्ञा करावी. ज्याप्रमाणे मुलगा अथवा मुलगी कर्तबगार निघाल्यावर आईबाबांना आनंद होतो. त्याप्रमाणे आपल्या शिष्याचे कर्तृत्व ऐकून गुरूला परमानंद होतो.

भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध 

जनक-याज्ञवल्क्य,शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.

 

 

Related posts

बजरंग दल, विहिंप भारतातील धार्मिक दहशवादी संघटना

News Desk

पासपोर्टसाठी जन्माच्या दाखल्याची गरज नाही

News Desk

अटलजींना आहेत हे आजार…

News Desk