नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भीषण दहशवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. देशातील अनेकांनी आपापल्यापरिने भारतीय सैन्यातील जवानांना आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, राजस्थानमधील रस्त्यावर भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेने देशापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. गेल्याच वर्षी मृत पावलेल्या या महिलेच्या शेवटच्या इच्छेनुसार तिच्या विश्वस्तांनी या महिलेले साठवलेले पैसे देशासाठी वापरले असून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या नावे दान केले आहेत.
Ajmer: Around Rs 6.6 lakh worth savings of a lady beggar, who passed away last year, was donated for families of CRPF soldiers who lost their lives in Pulwama attack. Her guardian handed a bank draft of the amount to the district collector. #Rajasthan pic.twitter.com/CUkW6B0zXb
— ANI (@ANI) February 21, 2019
राजस्थानमधील अजमेर येथील अंबे माता मंदिरासमोर नंदिनी शर्मा असे या महिलेने आयुष्यभर भीक मागूनच आपला उदरनिर्वाह केला. यातून जमलेले हे सर्व पैसे या महिलेने बँकेत जमा केले होते. असे करून या महिलेच्या नावावर ६ लाख ६१ हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली. या महिलेने तिच्या मृत्यू पश्चात २ विश्वस्तांना या रकमेची देखभाल करण्यास सांगितले. आपल्या मृत्यूनंतर हा पैसा देशासाठी आणि समाजासाठी वापरला जावा, अशी या महिलेची इच्छा होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.