लखनऊ | आज गेली अनेक वर्ष बाबरी मशीदचा प्रतिक्षेत राहीलेला प्रश्न सुटला आहे. बाबरी मशीद प्रकरणी लखनऊच्या विशेष न्यायालयाकडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अडवाणी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केले असून आपण आनंदी असल्याचे म्हटले आहे.
अडवाणी यांनी म्हटले आहे की, “बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. या निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वैयक्तिक आणि भाजपचा विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध होते”. तसेच, त्याच जागी भव्य राम मंदिर उभे केले जाणार आहे.
I wholeheartedly welcome the judgement by the Special Court in #BabriMasjidDemolitionCase. The judgement vindicates my personal and BJP's belief and commitment toward the Ram Janmabhoomi movement: Lal Krishna Advani after being acquitted by Special CBI Court, Lucknow pic.twitter.com/7E95Q1vCNp
— ANI (@ANI) September 30, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.