नवी दिल्ली | राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नये यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र,. सुप्रीम कोर्टाने अंतिम परीक्षेबाबत निर्णय दिला आहे. दरम्यान, अंतिम परीक्षा या घ्याव्याच लागणार आहेत, असे कोर्टाने म्हटले आहे. परीक्षांच्या तारखा एकवेळ पुढे ढकलू शकतो असेही सांगितले आहे. दरम्यान, ३० सप्टेंबर नंतर ज्या राज्यांना परीक्षा घ्यायच्या आहेत त्यांनी यूजीसीला अर्ज दाखल करावा असेही कोर्टाने सांगितले आहे.
तिसऱ्या वर्षांच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत, परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करुन पुढील वर्गात पाठवता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाने अधिकार दिले आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
Supreme Court upholds the University Grants Commission's July 6 circular to hold University final year exams.
Court says States must hold exams to promote students. It says states under Disaster management Act can postpone exams in view of pandemic & can consult UGC to fix dates pic.twitter.com/EcLcgLuRIz
— ANI (@ANI) August 28, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.