HW Marathi
क्रीडा देश / विदेश

भारताने पाकविरूद्ध खेळावे की नाही, ते केंद्राला ठरवू दे !

पुणे । “भारताने पाकिस्तानविरूद्ध खेळावे किंवा नाही, हा निर्णय केंद्राने घेऊ दे. आम्हाला त्यांचा निर्णय मान्य असेल”, असे भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्पष्ट केले आहे. ते शुक्रवारी (२२ फेब्रुवारी)पुण्यात बोलत होते. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये, असा एक मतप्रवाह दिसत आहे. याबाबत अनेक मतभेद आहेत.

‘पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळावे किंवा नाही ?,’ हा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला होता. ‘‘मी इतका बुद्धिवान माणूस नाही की या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन. भारताने पाकविरूद्ध खेळावे किंवा नाही, याचा निर्णय केंद्राने घेऊ दे”, असे कपिल देव यांनी यावेळी म्हटले. सिंहगड इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभासाठी पुण्यात आले होते. यावेळी माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे, संस्थेचे उपाध्यक्ष रोहित नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related posts

कॅप्टन कुलचा हा व्हिडिओ पाहिलात का ?

News Desk

मोदींना ‘आयुष्यमान भारत’ योजनेसाठी नोबेल द्यावा | डॉ. तमिलीसाई सुंदरराजन

अपर्णा गोतपागर

भारतीय राजकारणातील झंझावाती व्यक्तिमत्त्व हरपले | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk