HW News Marathi
देश / विदेश

#Lockdown2 : पंतप्रधानांनी या ‘सात’ गोष्टींमध्ये मागितली भारतीयांची ‘साथ’

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ एप्रिल) केली. या लॉकडाऊनच्या काळात नियम अधिक कठोर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनापासून जर आपल्याला लवकरच मुक्ती हवी असेल तर आत्तापर्यंत जसे सहकार्य केले, त्याच सहकार्याची अपेक्षा मोदींनी भारतीयांकडे केली आहे. तसेच, संवाद संपवताना त्यांनी देशवासीयांकडे ७ गोष्टींमध्ये साथ मागितला. ज्या केल्याने भारत लवकर कोरोनामुक्त होईल आणि पुर्ववत होईल.

मोदींनी आवाहन केलेल्या ७ गोष्टी –

१ – घरातील ज्येष्ठ नागरिकांची , विशेषत ज्यांना जुना कोणता आजार असेल, त्यांची विशेष काळजी घ्या.

२ – लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग आणि घरात वापरलेल्या मास्कचा वापर करा.

३ – रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा.

४ – आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलॉड करा.

५ – गरीब कुटुंबीयांची विशेष काळजी घ्या. त्यांना अन्न द्या.

६ – सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी सहानुभूतीने वागा, कोणालाही कामावरुन कमी करु नका.

७ – कोरोना वॉरीयर्स (डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार) यांचा सन्मान करा.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे एक वेगळाच विक्रम !

News Desk

‘हर बॅटलमें अटल’ अमूल कडून वाजपेयींना श्रद्धांजली

News Desk

‘सीएए’, ‘एनआरसी’विरोधात काँग्रेस आणि अर्बन नक्षल अफवा पसरवत आहेत !

News Desk