HW News Marathi
देश / विदेश

#Lockdown 2: भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन , पंतप्रधानांची मोठी घोषणा

नवी दिल्ली | कोरोना विरुद्धची ही भारतातील लढाई सर्व भारतीय उत्तमरीत्या सांभाळत आहेत. कोरोनाचा सामना करताना सगळेजण सर्व नियमांचे पालन करत आहेत त्यांचे मी मनापासून खरंच आभार मानतो, अशी पंतप्रधानांनी भारतीयांना संबोधित करण्यास सुरुवात केली. देशाची आर्थिक घडी कोरोनाने जरी विस्कटली असली तरी देशवासीयांच्या जीवनापुढे त्याची किंमत नाही असेही त्यांनी सांगितले. कोरोना ज्या पद्धतीने पसरत आहे, त्या अनुषंगाने सरकार आणि आरोग्य यंत्रणेला आणखी सतर्क केले आहे. लॉकडाऊन वाढवण्याची मागणी नागरिकांनी आणि सर्व स्तरावरुन मागणी येत होती. त्यामूळे भारतात लॉकाडऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात नियम आणखी कठोर होणार आहेत.

आज १४ एप्रिल भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. बाबासाहेबांनी जीवन निरंतर कसे जगावे हे शिकवले. त्यांना विनम्र अभिवादन करत त्यांनी संवादाला सुरुवात केली. भारतात नव्या वर्षाची सुरुवात ही अनेक सणांनी होते. परंतू, लॉकडाऊनच्या या काळातही सर्व नागरिक नियमांचे पालन करत घरातच सण, उत्सव सादरा करत आहेत. त्यांचे विशेष कौतुकही मोदींनी केले. कोरोनाची सध्या जगात काय परिस्थिती आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाची स्थिती ही स्थिर आहे. ज्यावेळी भारतात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता तेव्हाच ज्या देशात कोरोना आहे, तिथून विमानाने येणाऱ्या प्रत्येकाचे विमानतळावरट स्क्रिनींग केले जात होते. जेव्हा भारतात आकडा १०० पोहोचला तेव्हाच शाळा, कॉलेज, सिनेमागृहे, पब, स्विमींग पुल या सर्व बाबी बंद करण्यात आल्या. आणि जेव्हा हा आकडा ५०० वर गेला तेव्हा लॉकडाऊन करण्यात आले.

भारताने कोरोनाशी लढण्यासाठी आधीच तयारी केली होती. संकट मोठे होण्याची वाट न बघता लवकर निर्णय घेतले गेले, असेही पंतप्रधानांनी सांगितले. भारत इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. महिनाभरापूर्वी भारतासोबत इतर देशातही सारखीच परिस्थिती होती. मात्र, आता त्या देशांत ही वाढ २५-३० टक्क्यांनी झाली आहे.भारताने वेळीच हॉलिस्टिक अपरोच, इंटीग्रेटेड अपरोच आणि वेळेवर निर्णय घेतले नसते तर भारतात जी परिस्थिती उद्भवली असती त्याची कल्पनाही करता येत नाही, असेही त्यांनी म्हटले.

देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन , २० एप्रिलपर्यंत आकडेवारीचे बारकाईने मुल्यांकन करणार

कोरोनाची स्थिती पाहता लवकरात लवकर जर बाहेर पडायचे असेल तर सर्व नागरिकांना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामूळे देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. तसेच, देशात बऱ्याच ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट तयार होत आहे. याच हॉटस्पॉला आळा घालणे गरजेचे आहे. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक भाग, प्रत्येक स्टेशन, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्यांतील आकडेवारीचे बारकाईने मूल्यांकन केले जाणार आहे. जे क्षेत्र या अग्निपरिक्षेत यशस्वी होतील, जिथे हॉटस्पॉटमध्ये वाढ होणार नाही तिथे काही सूट दिली जाऊ शकते. परंतु ही परवनागी सशर्त असेल. लॉकडाऊनचे नियम अतिशय कडक असतील. हे नियम तोडले गेले आणि कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळले तर सगळी शिथीलता परत घेतली जाईल आणि त्या क्षेत्रात बंदी लावण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

  • तुम्हाला सलाम, तुमच्या संयम आणि त्यागामुळेच भारत कोरोनाशी लढत आहे
  • तुमचा संयम प्रेरणादायी
  • तुमच्यामुळे आपण बऱ्याच अंशी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला नागरिकांची संयम दाखवत खरी श्रद्धांजली
  • तुम्हाला खूप त्रास झाला मात्र तुम्ही तुमचे कर्तव्य निभावले
  • इतर देशांशी तुलना करण्याची वेळ नाही, पण आपली स्थिती महासत्तांच्या तुलनेत संतुलित
  • भारताने योग्य ते निर्णय घेतले नसते तर काय स्थिती असती याची कल्पना करवत नाही
  • राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी खूप मोलाचे कार्य केले
  • अनेक चर्चनंतर लॉकडाऊन वाढवण्यात यावा हा पर्याय वारंवार सुचविण्यात आला
  • कोरोना ज्या प्रकारे पसरत आहे आता जगाला-सरकारला सतर्क होणे आवश्यक
  • भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात येत आहे
  • पुढच्या काळात अधिक सतर्कता बाळगून कठोर पावले उचले आवश्यक
  • देशात नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणे आवश्यक
  • २० एप्रिलपर्यंत प्रत्येक राज्याचे मूल्यांकन होणार
  • जी राज्य २० एप्रिलपर्यंत कोरोनाला आळा घालतील तिथे लॉकडाऊन शिथिल
  • सरकार उद्या विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार
  • देशातील युवा वैज्ञानिकांनी या संकटकाळात पुढे येऊन यावे, कोरोनावर लस शोधावी
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून गरीब मजुरांसाठी विशेष प्रयत्न
  • घरातील ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी.
  • देशात १ लाख बेडची व्यवस्था आधीच केली आहे.
  • जवळपास ६०० रुग्णालये कोविड-१९ साठीच काम करत आहेत.
  • आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा.
  • आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलॉड करा.
  • गरीबांना अन्न द्या, त्यांची विशेष काळजी घ्या.
  • घरातून अत्यावश्यक बाबीसाठी बाहेर जाताना घरातच बनवलेले मास्क वापरा.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळच्या पुरग्रस्त परिस्थितीची पंतप्रधानांनी केली पहाणी, केरळला ५०० कोटींची मदत जाहीर

News Desk

टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरूद्ध दिल्लीत गुन्हा दाखल

News Desk

संभाजीराजेंवर केलेल्या आक्षेपार्ह टिकेप्रकरणी अ‍ॅड गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल

News Desk