HW Marathi
देश / विदेश

इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने पुन्हा एकदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला

ब्रिटन | पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीचा पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. नीरवला मंगळवारी (१९ मार्च) अटक करण्यात आले होते. अटकेनंतर त्याला इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात आज (२९ मार्च) सुनावणी सुरू होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ एप्रिलला होणार आहे. तसेच या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची ईडीने बदली केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अधिकारी  ब्रिटनमध्ये गेलेला आहे.

तर दुसरीकडे ईडीने सहाय्यक संचालक सत्यव्रत कुमार याच्या बदलीचा आदेश आज काढला. कुमार हे नीरव आणि मल्ल्या यांच्या तपासावर निरिक्षक होते. नीरव मोदीवरील सुनावणीसाठी ते सध्या लंडनमध्ये गेले आहेत, आणि ते वेस्टिमिंस्टर न्यायालयात उपस्थित आहेत. न्यायालयाने नीरवला गेल्या ९ दिवसांपासून तुरुंगात होता. न्यायालयात भारताकडून टोबी कॅडमन प्रतिनिधीत्व करत आहेत.

विशेष सत्र न्यायालयाने १५ मार्चला नीरव मोदीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. लंडनच्या हॉलबॉर्नमध्ये नीरव मोदीला १९ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी नीरव मोदीला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने नीरव मोदीला जामीन नाकारत २९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली होती.

 

Related posts

पुलवामामध्ये सुरक्षा दलाकडून ३ दहशतवादी ठार, १ जवान शहीद

News Desk

भारताला शांततेपेक्षा राजकारण महत्त्वाचे | शाह महमूद कुरैशी

अपर्णा गोतपागर

या समुद्रात बुडून दाखवाच!

News Desk