HW News Marathi
देश / विदेश

आज नीरव मोदीच्या जामीनप्रकरणी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. दरम्यान, नीरव मोदीच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (२९ मार्च) सुनावणी होणार आहे. लंडनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता नीरव मोदीच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. ईडी आणि सीबीआयचे संयुक्त पथक नीरव मोदीच्या सुनावणीसाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात दाखल झाले आहेत.

विशेष सत्र न्यायालयाने १५ मार्चला नीरव मोदीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. लंडनच्या हॉलबॉर्नमध्ये नीरव मोदीला १९ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी नीरव मोदीला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने नीरव मोदीला जामीन नाकारत २९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली होती.

ईडीने नीरव मोदीविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदीची पत्नी आमी मोदीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर, लंडन न्यायालयानेही नीरव मोदीला अटक करण्याचे आदेश दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरकोळ चोऱ्यामाऱ्या करुन राजकीय गुजराण करणाऱ्यातले अजित पवार नाहीत, राऊतांची जोरदार बॅटिंग

News Desk

“अनिल परब आणि मिलिंद नार्वेकरांचीही CBI चौकशी करा”

News Desk

नीरव मोदीला पुन्हा एक मोठा दणका

News Desk