HW Marathi
देश / विदेश राजकारण

मध्यप्रदेश विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत तहकूब

मध्यप्रदेश | ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मध्यप्रदेशात ऑपरेशन लोटस यशस्वी झाले. तसेच, ज्योतिरादित्य यांच्यासोबत आणखी २२ आमदारांनी राजीनामे दिले. कमलनाथ सरकारवर त्यामुळे ओढवलेले संकट काही काळापुरते दूर झाले. आज (१६ मार्च) विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांनी भाषण दिल्यानंतर लगेचच विधानसभा तहकूब करण्यात आली. २६ मार्चपर्यंत  विधानसभा तहकूब केल्यामुळे कोणताही ठराव संमत झाला नाही.
आज विश्वासदर्शक चाचणी देण्याचे आदेश राज्यपालांनी दिले होते. त्यासाठी सर्व आमदार उपस्थित होते. दरम्यान, भाजपचे आमदार आनंदात होते. परंतु, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांना पत्र लिहून ही चाचणी घेतली पुढे ढकलण्याची विनंती केली. काही आमदारांना बंदी करून ठेवण्यात आले आहे. तरी जोपर्यंत सर्व आमदारांना सोडत नाही तोपर्यंत ही चाचणी करू नये असे या पत्रात लिहिले होते.

आज सकाळी मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर राज्यपाल लालजी टंडन यांचे एक मिनिटाचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणाची पहिली आणि शेवटची ओळ वाचली. तसेच त्यांनी राज्यघटनेचे पालन करण्याचे आवाहनही सर्व आमदारांना केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विश्वासदर्शक ठरावाशिवायच विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित केले आहे.

 

Related posts

सलग १३व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

अपर्णा गोतपागर

 मेगाभरतीवरून चंद्रकांत पाटलांचा  यू-टर्न

rasika shinde

मोदी है तो मुमकीन है ! जमिनीवर आणि अंतराळातसुद्धा !

News Desk