नवी दिल्ली | मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधीयांसारख्या बड्या नेत्याने बंड करून भाजपमध्ये प्रवेश केल्याने कमलनाथ सरकार चांगलेच अस्थिर झाले आहे. त्यातच, सर्वोच्च न्यायालयाने कमलनाथ सरकारला आज (२० मार्च) म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आपले बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. कमलनाथ सरकारपुढे आधीच हे आव्हान असताना आता त्यांच्यासमोर आणखी एक समस्या उभी राहिली आहे. काल (१९ मार्च) म्हणजेच गुरुवारी रात्री उशिरा मध्य प्रदेशाच्या विधानसभा अध्यक्षांनी मध्य प्रदेशमधील बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. मध्य प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारले आहेत.
Madhya Pradesh Assembly Speaker NP Prajapati: Resignations of all members of the assembly who had submitted their resignation on 10th March 2020, have been accepted. pic.twitter.com/RUWUywXdPJ
— ANI (@ANI) March 19, 2020
“मध्य प्रदेश विधानसभेच्या सदस्यांनी १० मार्च २०२० रोजी माझ्याकडे सोपविलेले त्यांचे राजीनामे मी स्वीकारत आहे”, अशी घोषणाच काल एनपी प्रजापती यांनी केली. ज्योतिरादित्य शिंदेंनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांच्यासह कमलनाथ सरकारमधील काही आमदार आणि मंत्र्यांनी देखील बंड करत आपल्या पदांचे राजीनामे सुपूर्द केले होते. मात्र, त्यावेळी मध्य प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांकडून त्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले नव्हते. मात्र, गुरुवारी रात्री उशिरा अखेर एनपी प्रजापती यांनी या बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज होणाऱ्या बहुमत चाचणीत कमलनाथ सरकारला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणूनच, कमलनाथ सरकारच्या या बहुमत चाचणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.