HW Marathi
देश / विदेश राजकारण

आज मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकारची अग्नपरिक्षा

नवी दिल्ली | मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकारची आज (२० मार्च) बहुमत चाचणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने काल (१९ मार्च) कमलनाथ सरकारला विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, असा आदेश दिला होता. विधानसभेत बहुमत चाचणीसाठी एक दिवसाचे विषेश अधिवेशन बोलविण्या यावे, यात हात उंचावून मतदान घेण्यात यावे, असे निर्देश न्यायालयाने दिली आहेत. तसेच  बंडखोर आमदार विधानसभेत यांचे असेल तर त्यांना कर्नाटक आणि मध्य प्रदेश पोलिसांनी संरक्षण द्यावे, असे न्यायालयाने सांगितले आहे.

दरम्यान, न्यायालायने आदेश दिल्यानंतर त्यांनी काल (१९ मार्च)  रात्री उशिरा मध्य प्रदेशाच्या विधानसभा अध्यक्षांनी मध्य प्रदेशमधील बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. मध्य प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारले आहेत.“मध्य प्रदेश विधानसभेच्या सदस्यांनी १० मार्च २०२० रोजी माझ्याकडे सोपविलेले त्यांचे राजीनामे मी स्वीकारत आहे”, अशी घोषणाच काल एनपी प्रजापती यांनी केली.

तसेच मध्य प्रदेशाच्या बहुमत चाचणीदरम्यानचे सर्व कामकाजाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणीचे कामकाज आटोपण्यात यावे, अशा सूचना न्यायालयाने कमलनाथ सरकारला दिल्या आहेत. मध्य प्रदेशात ज्योतिरादित शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीरामा दिला. ज्योतिरादित शिंदेसह २२ आमदार आणि मंत्र्यांनी राजीनामा दिला. यानंतर मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे.

असे आहे मध्य प्रदेश विधानसभेचे गणित

मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा आहेत. दोन आमदारांचे निधन झाल्याने ही संख्या २२८ वर पोहोचली आहे. काँग्रेसकडे ११४ आमदार आहेत. इथे बहुमताचा आकडा ११५ आहे. काँग्रेसला ४ अपक्ष आणि २ बसपा, १ सपा आमदाराने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ १२० वर पोहोचले आहे. दुसरीकडे भाजपकडे १०७ आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बाजूचे तब्बल २२ आमदार राजीनामा देऊन भाजपला साथ देऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसचे सरकार अल्पमतात येऊ शकते.

 

Related posts

गोवा भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Gauri Tilekar

फडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार !

News Desk

विरोधी पक्ष ‘मोदी हटाव’चे नारे देण्यात तर मी लोकहिताचे निर्णय घेण्यात व्यस्त !

News Desk