HW News Marathi
देश / विदेश

दिलासादायक ! अमेरिकेला सापडले ‘कोरोना’वरचे औषध

नवी दिल्ली | जगभरात सध्या कोरोना व्हायरसने मोठा धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहान शहरात सर्वप्रथम आढळलेल्या या व्हायरसचा प्रादुर्भाव अनेक देशांमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे, अद्याप या व्हायरसवर निश्चत असे औषध सापडले नसल्याने संपूर्ण जगासाठीच आता हा चिंतेचा विषय बनला होता. मात्र, आता अमेरिकेकडून कोरोनावर औषध सापडल्याचा दावा केला आहे. मलेरियासाठी देण्यात येणाऱ्या औषधाचा वापर करून कोरोना व्हायरस झालेल्या रुग्णावर उपचार केले जाऊन शकतात, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानेही मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या या दाव्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या सर्वच देशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

“मलेरियावर उपचार केल्या जाणाऱ्या ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ या औषधाने कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे परीक्षणातून सिद्ध झाले आहे. या औषधाचा परिणाम सकारात्मक आहे”, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. जगभरात अनेक देशांत गेल्या बऱ्याच दिवसांपासून कोरोनाबाधितांचा तासागणिक वाढत असलेला आकडा आता चक्क २ लाखांहूनही पुढे गेला आहे. लहान मुले आणि वयोवृद्धांना या व्हायरसचा जास्त फटका बसत आहे. त्यातच, या आजारावर कोणतेही ठोस औषध किंवा उपाय सापडत नसल्याने सर्वच स्तरांतून मोठी चिंता व्यक्त होत होती. आता अखेर यात अमेरिकेला यश आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, आता कोरोनावर मात करणे काहीसे सोपे झाले आहे. ही निश्चितच संपूर्ण जगासाठी मोठी दिलासादायक बाब आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या अर्थसंकल्पाबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या…

Aprna

केंद्राने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅसच्या किंमतीबाबत दाखवावी, सुळेंचा टोमणा

News Desk

सालाबादप्रमाणे CBSE१० वीच्या निकालात मुलींनी मारली बाजी !

News Desk