HW Marathi
देश / विदेश राजकारण

आज देशभरातील डॉक्टरांचा एक दिवसीय संप

मुंबई | देशभरातील डॉक्टरांनी आज (१४ जून) एक दिवसांचा संप पुकारला आहे. कोलकात्यामध्ये एनआरएस वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. पुण्यातील बीजे वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मार्डचे डॉक्टरही या संपात सहभागी झाले आहेत. हा संप आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे. तर तातडीची वैद्यकिय सेवा वगळता बाहयरुग्ण विभाग आणि वॉर्डमधील सेवा बंद राहणार आहेत.

कोलकात्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरातील वैद्यकिय क्षेत्रात उमटलेले चित्र दिसून येते आहे. यानिमित्ताने देशातील इंडियन मेडिकल असोसिएशन संघटना देखील या मारहाणीच्या निषेधार्थ आज काळ्या फिती लावून काम करणार आहेत. त्याचबरोबर मार्डच्या डॉक्टरांनी संप पुकारला असल्याने आज रुग्णांना ससूनमध्ये तातडीच्या वगळता कोणत्याही सेवा दिल्या जाणार नाहीत. तर सकाळी साडेदहा वाजता बीजे वैद्यकिय महाविद्यालयाच्या आवारात जमून कोलकात्याच्या घटनेचा निषेधही व्यक्त केला जाणार आहे.

नेमके काय आहे प्रकरण

एनआरएसच्या रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे ज्युनिअर डॉक्टराला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या घटनेत डॉक्टर गंभीररित्या जखमी झाला. त्यांना त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोलकात्यातील रुग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरांनी काम बंद केले असून या डॉक्टरांनी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. यावेळी डॉक्टरांनी पोलिसांवर सुद्धा आरोप केला. की, डॉक्टराला मारहण झाल्यानंतर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही.

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टारांचा वाद चिघळला आहे. ज्युनिअर डॉक्टर आंदोलन करत आहेत. तर त्यांना समर्थन देण्यासाठी सीनिअर डॉक्टरसमोर आले आहेत. यामुळे बुधवारी (१२ जून) बंगालमधील आरोग्य सेवा ठप्प झाली होती. मंगळवारीपासून ज्युनिअर डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेदार्थ आंदोलन सुरु केले.

Related posts

भारतीय लष्कराला तोफांच्या रूपात दिवाळी भेट

Shweta Khamkar

दूध-अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

News Desk

दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस महागला

Gauri Tilekar