नवी दिल्ली | दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग आज (२६ जुलै) लागली आहे. राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि जवानदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
सकाळी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांच्या मदतीने ही आग आता आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. या आगीमुळे राज्यपाल कक्षातल्या मालमत्तेचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, आता ही आग विझवण्यात आली आहे. सदनातल्या इतर कोणत्याही भागाला या आगीचा फटका बसलेला नाही, अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
Delhi: Fire breaks out at Maharashtra Sadan, four fire engines rushed to the spot; fire under control
— ANI (@ANI) July 26, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.