नवी दिल्ली | पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराकडून पहिल्यांदा पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. “आम्ही युद्धाची तयारी करत नाही, उलट भारत आमच्यावर युद्ध लादत आहे.” असे बोलून पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन भारताने केलेले आरोप पाकने फेटाळून लावले आहेत. पाक मेजर गफूर पुढे असे देखील म्हणाले की, आम्ही युद्धासाठी तयार नसलो तरी भारताचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत.”
Major General Asif Ghafoor,DG ISPR,Pakistan Army on talks in India that Pakistan is preparing for war: We're not preparing for war. It's you(India) who is sending war threats. We're not preparing for initiating a war but we've a right to respond to the war threats from your side pic.twitter.com/INfcG5KfrM
— ANI (@ANI) February 22, 2019
पुलवामा हल्ल्यासाठी भारतच जबाबादार असल्याचा अजब आरोप पाकिस्ताने लावला असून ज्या ठिकाणी पुलवामानातील सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला, ते ठिकाण नियंत्रण रेषेपासून खूप दूर आहे. त्यामुळे पाकिस्तानातील एखादी व्यक्ती तिथंपर्यंत पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे या हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार कसा?’, असा उलटा सवाल पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल यांनी उपस्थित केले आहे.
Major General Asif Ghafoor, DG ISPR, Pakistan Army: There are two senior Pakistan army officials under military custody on the charges of espionage. Army Chief has ordered their court martial. It is in process. Both are individual cases, there is no link between the two cases. pic.twitter.com/sMnGUKixNg
— ANI (@ANI) February 22, 2019
भारताकडून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोपदेखील पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला. भारतात ज्यावेळी निवडणुका येतात, त्यावेळी दहशतवादी हल्ले होतात. ‘२००१ मध्ये भारताच्या संसदेवर हल्ला झाला. २००२मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत्या. २००८ मध्ये मुंबईवर हल्ला झाला. २००९ मध्ये भारतात निवडणूक होती. या दोन्ही घटनांचा तर्क लावून पाकिस्तानने पुलवामात हल्लेचे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा पाककडून केला आहे. उलट भारतात लोकसभा निवडणुका असल्यामुळे हा हल्ला झाल्याचे आरोप पाकिस्तानी लष्कराने भारतावरच केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.