नवी दिल्ली | “पाकिस्तानची वागणूक जर बदलत नसेल आणि ते दहशतवाद्यांना पाठिंबा देणे कायम ठेवणार असतील. तर त्यांच्यासोबत मानवतेने वागण्यात काय अर्थ आहे ?”, असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने १४ फेब्रुवारीला भारतीय जवानांवर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
Nitin Gadkari: Nirnay kewal mere dept ka nahi hai, sarkar aur PM ke level pe nirnay hoga par maine apne department se kaha hai ki Pakistan ka jo inke adhikar ka bhi paani ja raha tha vo kahan kahan rok sakte hain uska techinical design bana ke taiyaari karo pic.twitter.com/tODGFb4T8g
— ANI (@ANI) February 22, 2019
“भारतातून पाकिस्तानात वाहून जाणाऱ्या ३ नद्यांचे पाणी वळविण्याचा निर्णय हा केवळ माझ्या खात्याचा नसेल. केंद्र, पंतप्रधान हा निर्णय घेतील. मी केवळ माझ्या खात्याअंतर्गत येणाऱ्या खात्यांना पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी कुठे कुठे रोखता येईल याविषयी तांत्रिक आराखडा बनवण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत”, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध व्यक्त ना करता उलट भारतालाच धमकी दिल्याने हा वाद आणखीच चिघळला आहे.
#WATCH Union Min Nitin Gadkari says,"Nirnay kewal mere dept ka nahi hai, sarkar aur PM ke level pe nirnay hoga par maine apne department se kaha hai ki Pakistan ka jo inke adhikar ka bhi paani ja raha tha vo kahan kahan rok sakte hain uska technical design bana ke taiyaari karo" pic.twitter.com/42KgwFrVzk
— ANI (@ANI) February 22, 2019
“भारतातील माध्यमे, राजकारणी लोक पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोप आमच्यावर करीत आहेत. मात्र, कोणत्याही पुराव्यांअभावी, न्यायव्यवस्थेच्या वर जाऊन तुम्ही आमच्यावर हे आरोप कसे काय करू शकता ? भारताने जर आमच्यावर हल्ला करण्याचा विचार केला तर आम्ही विचारही करणार नाही. आम्ही थेट प्रत्युत्तरच देऊ”, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते.
“भारताने शांततेची बोलणी केली तर आम्ही देखील करू. मात्र जर भारताने युद्धाची भाषा केली, तर आम्ही देखील आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. मग ना कधी गवत उगवेल, ना कधी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येईल आणि ना कधी मंदिरात घंटानाद होईल”, अशी धमकी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी दिली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.