नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष पद रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवा, असा सल्ला भाजपचे जेष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिला आहे. सुब्रह्मण्यम यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवर असे ट्वीट केले आहे.
After witnessing Goa and Kashmir, I feel that nation's democracy will weaken if we are left with BJP as a single party. Solution? Ask Italians & progeny to leav. Mamata can then be President of united Congi thereafter. NCP should also follow and merge.
— Subramanian Swamy (@Swamy39) July 12, 2019
सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्वीट करत म्हटले की, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनिकरण करायला हवे तसेच ममता बॅनर्जींना काँग्रेस अध्यक्ष बनवायला हवे अस स्वामी यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी गोवा आणि काश्मीरचे घटनाक्रम पाहता असेच जर होत राहीले तर लोकशाहीला धोका असून ती कमजोर होईल असे ते म्हणाले. इटालियन्स आणि वंशजांना पार्टी सोडायला सांगा. तरच ममता बॅनर्जी अध्यक्ष होऊ शकतील असंही त्यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.