HW News Marathi
महाराष्ट्र

इतिहासकार पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचे निधन

ठाणे | भारतीय इतिहासाची जपणूक करण्यात आयुष्य वेचणाऱ्या पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोरक्षकर यांचे वृद्धापकाळाने यांनी आज (१३ जुलै) सकाळी त्यांचे निधन झाले आहे.

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअममध्ये (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) सहाय्यक अभिरक्षक म्हणून १९६४ मध्ये त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली.

गोरक्षकर यांनी व्यापक लिखाण केले असून राजभवन्स इन महाराष्ट्र, अ‍ॅनिमल्स इन इंडियन आर्ट, द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया, कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया, कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. पश्चिम भारतातील गुप्तकालीन शिल्पकलेवरही त्यांनी लेखन केले. या कार्याबद्दल २००३ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

गोरक्षकर यांची प्रकाशित पुस्तके

डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र

राजभवन्स इन महाराष्ट्र

अनिमल्स इन इंडियन आर्ट

द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया

कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया

कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीच्या कारवाईविरोधात मलिकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna

आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही, राऊतांचे राणेंना प्रत्युत्तर

News Desk

जनतेने तुम्हाला सत्ता दिली नव्हती – चंद्रकांत पाटील

News Desk