नवी दिल्ली | भारतीय बँकांचे तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग सोपा झाला आहे. विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण आदेशावर ब्रिटनच्या गृह सचिवांनी ३ फेब्रुवारी रोजी अखेर स्वाक्षरी केली आहे. दरम्यान, ब्रिटनच्या गृह सचिवांकडून प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली असली तरी एक अडचण कायम आहे.
United Kingdom Home Office: The Home Secretary has formally signed the extradition order for Vijay Mallya. Mallya can formally begin his appeal process. pic.twitter.com/trA3uHbFvK
— ANI (@ANI) February 4, 2019
Vijay Mallya has 14 days from today to apply for leave to appeal https://t.co/hsNsD8ZAip
— ANI (@ANI) February 4, 2019
ब्रिटनच्या गृह सचिवांकडून मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली असली तरीही मल्ल्याकडे या विरोधात अपिल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पुढच्या १४ दिवसांत विजय मल्ल्या वरच्या न्यायालयात जाऊन या प्रत्यार्पण आदेशाला आव्हान देऊ शकतो. विजय मल्ल्याविरोधात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत ब्रिटनच्या गृह सचिवांनी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची माहिती सचिव कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.