HW News Marathi
देश / विदेश

ममता बॅनर्जी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, जे पी नड्डा आंदोलनाला बसणार

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनेमोठा विजय प्राप्त केला आहे. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीयांचा पराभव झाला आहे. यानंतर बंगालमध्ये हिंसाचार उफाळला होता. या साऱ्या राजकीय कोलाहलात ममता बॅनर्जी या आज सकाळी १०.४५ वाजता राजभवनात शपथ घेणार आहेत. राजभवनात हा कार्यक्रम केला जाणार आहे.

एकीकडे कोलकात्यात ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे बंगालधील हिंसाचाराविरोधात धरणे धरणार आहेत.कोरोना महामारी पाहता ममता बॅनर्जी यांनी शपथ समारंभाला ५० लोकांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा समावेश आहे.

निकालानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होऊ लागले असून भाजपाचे जे पी नड्डा यांनी देशाच्या फाळणीवेळसारखी हिंसा असल्याची टीका केली आहे. हिसेविरोधात दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. नड्डा यांनी दक्षिण परगना आणि कोलकाताच्या बेलेघाटामध्ये हिसेत मृत झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. आज भाजपा देशभरात धरणे आंदोलन करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला मोठा दिलासा! कर्नाटक न्यायालयाकडून ‘या’ आदेशाला स्थगिती

Darrell Miranda

पाकला आता भारतीय टोमॅटोही झोंबले

News Desk

तिला’ लागली चक्क ५०० अब्ज रुपयांची लॉटरी!

News Desk