नवी दिल्ली | “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या झाशीच्या नावावर कलंक आहे. परंतु ममता या झाशीची राणी होऊ शकत नाही तर त्या पुतना मावशी किंवा किम जोंग उन होऊ शकतात,” असे वादग्रस्त विधान भाजप नेता आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह केले आहे. ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर त्यांना समर्थकांकडून आधुनिक काळातील झाशीची राणी संबोधले जात आहे. ममता बॅनर्जी या नवीन पिढीला झाशीची राणी वाटत आहे. यावरू गिरिराज यांनी ममतावर निशाणा साधला.
#WATCH Union Minister Giriraj Singh on reports that TMC said West Bengal CM Mamata Banerjee is the Jhansi ki Rani of the modern times: Shayad Jhansi ki Rani ke upar ye gaali hai. Ye Putana (demoness) ho sakti hain Jhansi Ki Rani nahi ban sakti hain. Ye Kim Jong Un ho sakti hain.. pic.twitter.com/320x2uWAuc
— ANI (@ANI) February 8, 2019
पुढे गिरिराज बोलताना म्हणाले की, “रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोरांना समर्थन देणारी आणि भारताला तोडण्याची भाषा करणाऱ्या झाशीची राणी आणि पद्मावती असू शकत नाहीत.” दरम्यान, गिरिराज यांच्या या वक्तव्यांवरून वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही अशाच वादग्रस्त वक्तव्यांनी केंद्रीय मंत्री चर्चेत आले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.