नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन मागे घेतले आहे. ममता बॅनर्जी या गेल्या तीन दिवसांपासून धरण्यावर बसल्या होत्या. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी ममतांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Kolkata: The Court gave a positive judgement today. Next week, we will continue to take up the issue in Delhi. https://t.co/JXmkfDmngV
— ANI (@ANI) February 5, 2019
केंद्र सरकारला राज्यासह सर्व संस्था ताब्यात ठेवायच्या आहेत. त्यामुळे मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन गुजरातला परत जावे. एका व्यक्तीचे आणि एका पक्षाचे सरकार त्यांनी तिथे चालवावे, अशा शब्दांत ममतांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला
West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Kolkata: They (Central govt) want to control all the agencies including the state agencies also? PM you resign from Delhi and go back to Gujarat. One man govt, one party government is there. pic.twitter.com/RckwAR0uUE
— ANI (@ANI) February 5, 2019
सर्वोच्च न्यायालयाने आज (५ फेब्रुवारी) झालेल्या सीबीआय प्रकरणाच्या सुनावणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना नोटीस बजावले असून सीबीआला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे. राजीव कुमार यांना अटक करण्यात येऊ नये असेही या आदेशांमध्ये म्हटले आहे. त्यानुसार राजीव कुमार यांनी २० फेब्रुवारी रोजी हजर होण्याचे आदेश देण्यात सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
Next day of hearing is February 20. https://t.co/VUzsg9P9XN
— ANI (@ANI) February 5, 2019
नेमके काय आहे प्रकरण
सीबीआय पथक शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांच्या तपासात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी आली होती. या प्रकरणी ममता बॅनर्जी यांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची पाठराखण करत त्यांच्यासाठी रविवारी (३ फेब्रुवारी) धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. या प्रकरणानंतर ममता यांनी राजीव कुमार यांच्या निवासस्थानी गेल्या त्यानंतर कोलकाताच्या मध्यवर्ती मेट्रो सारणी भागात त्यांनी धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. राजीव कुमारदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.