मुंबई । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बंधू एसएस कोहली यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. दरम्यान, एसएस कोहली यांच्यासह अमृतसरचे माजी महापौर ओम प्रकाश गब्बर त्याचप्रमाणे काँग्रेसच्या मजदूर विभागाचे जिल्हा अध्यक्ष साहिब सिंग, माजी बँक पदाधिकारी जे. एस. बिंद्रा यांनीही आपमध्ये प्रवेश केला आहे.
एसएस कोहली यांच्यासह आपमध्ये प्रवेश केलेले ओम प्रकाश गब्बर हे पहिल्यांदा अकाली दलाच्या तिकिटावर नगरसेवक झाले होते. २०१७ साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणूकही लढवली होती. गब्बर हे भगवान वाल्मिकी धूना साहिब मॅनेजमेंट ट्रस्टचे अध्यक्षही आहेत. तर मनमोहन सिंग यांचे बंधू एसएस कोहली हे लष्करातील माजी कमांडर आहेत.
आपची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे, आगामी काळात आपला मोठा फायदा होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसचे अनेक नेते आपमध्ये सामील होत आहेत.