HW News Marathi
Covid-19

कोरोनाशी लढण्यासाठी मनमोहन सिंग यांचे नरेंद्र मोदींना ‘हे’ सल्ले

नवी दिल्ली | देशामध्ये वाढणारा कोरोनाचा संसर्ग पाहून यावर उपाययोजना सुचवणारा पाच कलमी कार्यक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे दिला आहे. अमेरिका, युरोपीय देशांनी ज्या लसींना मंजुरी दिली आहे अशा लसींचा समावेश आपल्या देशातील लसीकरण मोहिमेत करून कोरोनावरील लसीकरण मोहिमेला गती देण्याची गरज आहे. अशा महत्त्वाच्या सूचना या पाच कलमी कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांना मनमोहन सिंग यांनी केल्या आहेत.

मनमोहन सिंग यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनावरील लसीची गती आणखी वाढवावी लागेल. कारण कोरोनावरील उपचारासाठी हे महत्त्वाचे आहे. किती लोकांचे लसीकरण झाले यापेक्षा लोकसंख्येच्या किती टक्के लसीकरण झाले आहे हे महत्त्वाचे आहे. तसेच ४५ वर्षांहून कमी वयाच्या लोकांनादेखील लसीकरण करण्यात यावे म्हणजे ज्यांचे वय ४५ पेक्षा कमी आहे पण हे आरोग्य कर्मचारी आहेत, शिक्षक, बस, टॅक्सीचालक आहेत त्यांनासुद्धा प्राधान्याने लस दिली पाहिजे, असे मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे सुचवले आहे.

मनमोहन सिंग पुढे असं देखील म्हटले आहे की, लस उत्पादकांना कोरोनावरील किती डोसची ऑर्डर दिली गेली आहे आणि पुढील सहा महिन्यांत किती डोसचा पुरवठा केला जाईल याची माहिती सरकारने जनतेला दिली पाहिजे. तसेच पुढील सहा महिन्यांत किती लोकसंख्येचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आपल्याकडे किती लसीचा साठा उपलब्ध करावा लागेल किंवा त्यासाठी किती ऑर्डर द्यावी लागेल का त्याचबरोबर विविध राज्यांना अपेक्षित असलेला लसीचा साठा कसा मिळेल, असे काही प्रश्न मनमोहन सिंग यांनी लिहिलेल्या या पत्रात उपस्थित केले आहेत.

– पुढील सहा महिन्यांसाठी किती लसींची ऑर्डर दिली आहे हे जाहीर करावे.

– राज्यांना अपेक्षित असलेला साठा कसा पुरवला जाईल याबाबत संकेत द्यावेत.

– राज्यांना प्रंटलाइन वर्कर्सची श्रेणी ठरवण्यासाठी सूट द्यायला हवी.

– वापरासाठी परवानगी दिलेल्या कुठल्याही लसीच्या आयातीसाठी परवानगी द्यावी, या पाच मुद्दय़ांचा या पत्रामध्ये समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपतींची पत्नी सविता कोविंद यांनी गरिबांसाठी मास्क शिवत कोरोनाविरुद्धच्या लढाईत घेतला पुढाकार

News Desk

कोंबडी,मटण,मासे विकणाऱ्यांसाठी खुशखबर ! हाॅटेल व्यावसायिकांनाही सरकारचा दिलासा

Arati More

कोरोनाची लस आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी लोकांसमोर येऊन घ्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी

News Desk