HW News Marathi
देश / विदेश

मनोहर पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गुरुवारी (२३ ऑगस्ट) अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु पर्रिकर हे आज (२९ ऑगस्ट) रोजी पुढील उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार आहेत. आज अमेरिकेला जाण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अमेरिकेतील स्लोन केटरिंन केन्सर रुग्णालयात ११ दिवस उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री पर्रिकर २२ ऑगस्ट रोजी गोव्यात दाखल झाले होते. पर्रिकरांसोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर आणि गोमेकॉचे डॉ. कोलवाळकर हे देखील अमेरिकेला गेले होते.

अमेरिकेतून परल्यानंतर पर्रिकर यांनी दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजप नेत्यांकडून हाती घेतला व ते लोकांच्या गर्दीत सहभागी होऊन अर्धा किलोमीटर चालत गेल. दुसऱ्या दिवशी पर्रिकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झारखंडमध्ये खाजगी बसचा भीषण अपघात, ११ जणांचा जागीच मृत्यू

News Desk

मोदींचा घोटाळा

News Desk

#Coronavirus : आंतर मंत्रालयीन केंद्रीय टीमला ममता बॅनर्जींचा विरोध

News Desk