HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून मसूद अझरची पाठराखण, म्हणे तो घराबाहेर देखील पडू शकत नाही

नवी दिल्ली | “मसूद अजहर पाकिस्तानात असला तरी त्याची प्रकृती इतकी खालावलेली आहे कि तो घराबाहेर देखील पडू शकत नाही”, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून आता जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. यावेळी जगभरातून पाकिस्तानला मोठा रोष पत्करावा लागला होता.

“मसूद अझर हा पाकिस्तानात आहे. मात्र, त्याची प्रकृती इतकी खालावलेली आहे कि घराबाहेर देखील पडू शकत नाही”, असे कुरेशी यांनी म्हटले आहे. “भारताकडे मसूदविरोधात काही पुरावे असतील तर ते त्यांनी ते सादर करावेत. पाकिस्तानची जनता आणि न्यायव्यवस्थेला याची खात्री पटली कि पुढील कारवाई करू”, असेही कुरेशी यांनी म्हटले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाने मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित करावे यासाठी भारत प्रयत्नशील आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०१९ मध्ये होणार ‘चंद्रयान-२’ प्रक्षेपण

Gauri Tilekar

डेनिस मुकवेगे, नादिया मुराद यांना नोबेल पुरस्कार

swarit

अमृतसर रेल्वे अपघातासाठी नागरिकच जबाबदार, सीसीआरएसचा अहवाल

News Desk