HW News Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा, मायावतींची मागणी

लखनऊ | उत्तर प्रदेशातील हाथसर आणि बलरापूर येथे दोन तरुणींवर बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर येथील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते पीडित मुलीच्या घरी जाण्यास निघाले होते.

मायावती यांनी आज ( १ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश सांभाळता येत नसेल तर त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेऊन इतरांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करा किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी मायावती यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणासीतून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी किमान उत्तर प्रदेशाकडे तरी लक्ष द्यावे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी मागणीही मायावती यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ४ जवान शहीद

News Desk

#AyodhyaJudgement : सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत जमावबंदी लागू

News Desk

इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, पाकिस्तानची मागणी

News Desk