नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १४ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने काहीच दिवसांपूर्वी न्यायालयात एक दावा केला होता. “मी पीएनबी घोटाळ्यामुळे नव्हे तर वैद्यकीय उपचारांसाठी देश सोडला आहे”, असे मेहुल चोक्सीने म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर, मेहुल चोक्सीविरोधात ईडीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. “मेहुल चोक्सी तब्येतीचे कारण देत न्यायालयाची दिशाभूल करून कारवाईस विलंब करण्याचा प्रयत्न आहे”, असा आरोप या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.
Enforcement Directorate has filed a counter affidavit in a Mumbai court in connection with Mehul Choksi case,the affidavit states,"The medical reasons&conditions appear to be facades being erected merely to mislead the court in an obvious attempt to delay the lawful proceedings." pic.twitter.com/AsRJYWpScC
— ANI (@ANI) June 22, 2019
“मेहुल चोक्सीला अँटिग्वावरुन भारतात आणण्यासाठी हवाई रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येईल. त्याचप्रमाणे, भारतात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून मेहुल चोक्सीवर आवश्यक ते उपचार करण्यात येतील”,असेही ईडीने न्यायालयात सांगितले आहे. त्याचप्रमाणे, ईडीकडून आपली ६ हजार १२९ कोटी रुपयांची जप्त करण्यात आली असून ते चुकीचे असल्याचे मेहुल चोक्सीने म्हटले होते. मात्र, फक्त २ हजार १०० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आल्याचे ईडीकडून प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
Enforcement Directorate in its affidavit in a Mumbai court states, "He (Mehul Choksi) never cooperated in investigation. Non bailable warrant was issued against him. A Red Notice was issued by the Interpol. He has refused to return, he is therefore, a fugitive and an absconder." pic.twitter.com/meWsiavv2B
— ANI (@ANI) June 22, 2019
“जर न्यायालयाने परवानगी दिली तर तपास अधिकारी अँटिग्वाला माझ्या चौकशीसाठी येऊ शकतात”, असेही मेहुल चोक्सीने यापूर्वी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात मेहुल चोक्सीकडून चौकशीदरम्यान टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ईडीने केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.