HW News Marathi
देश / विदेश

हरियाणात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक | आठवले

नवी दिल्ली | छत्रपती शिवाजी महाराजांचे हरयाणामध्ये भव्य स्मारक उभारणार व त्या स्मारकात शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल. त्यासाठी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची आणि केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री महेश शर्मा यांनी आपण लवकर भेट घेणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हरयाणातील रोड मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

हरयाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज विश्व परिषदेचे गौरव मराठा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने रामदास आठवले यांची आज नवी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा आठवलेंना भेट देण्यात आली. यावेळी आठवलेंनी रोड मराठा समाजच्या शिष्टमंडळास हरयाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

हरयाणामधील पानिपतचा इतिहास सर्वश्रुत आहे. सन 1761 मध्ये अहमदशाह अब्दाली आणि मराठा सैन्यामध्ये झालेले पानिपतचे घनघोर युद्ध इतिहास प्रसिद्ध आहे. त्याकाळापासून युद्धासाठी गेलेले मराठे हरयाणाच्या पानिपत सोनिपत आदी भागांत विखुरले आहेत. पिढ्यांपिढ्या मराठे तिथे राहिल्याने ते हरयाणाचेच झाले. त्यांना रोड मराठा म्हणून हरयाणा मध्ये ओळखले जाते. ही शूर मराठ्यांची जात असून त्यांनी आपली पूर्वजांशी असलेली बांधिलकी सोडली नसून मूळ आपले महाराष्ट्रात आणि शिवशाही मध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यशाली इतिहास आजही प्रेरणादायी असून रोड मराठा समाजाला त्याचा अभिमान आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हरयाणामध्ये स्मारक उभारले जावे .

या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जावा अशी रोड मराठा समाजाची मागणी असून ती मागणी छत्रपती शिवाजी महाराज विश्व परिषदच्या शिष्टमंडळाने आज केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली. ही मागणी मंजूर मारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे तथा हरयाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले आहे. यावेळी शिष्टमंडळात गौरव मराठा आणि डॉ. प्रीतिष जळगावकर तसेच अन्य मान्यवरांचा समावेश होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळच्या पुरग्रस्त परिस्थितीची पंतप्रधानांनी केली पहाणी, केरळला ५०० कोटींची मदत जाहीर

News Desk

२०२४ साली लोकसभेच्या निमित्ताने राम मंदिराचा कळस उभारला जाईल !

News Desk

नवनीत कौरचा धमाका, भारतीय महिला हॉकी संघाची आयर्लंडवर 1-0 नं मात

News Desk