HW News Marathi
देश / विदेश

अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर, उपाचारासाठी न्यूयॉर्कला रवाना

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सरचे निदान झाले आहे. जेटली कॅन्सरच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प जेटली यांच्याविना मांडला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला मांडण्यात येणार आहे.

जेटली यांना मांडीचा कर्करोग झाला असल्याची माहिती एका इंग्रजी संकेतस्थळाने अशी माहिती दिली आहे. तो एक प्रकारचा ट्युमर असल्याने तो शरीराच्या उर्वरित भागात अतिशय वेगाने फैलावू शकतो, त्यामुळे सर्जरीसाठी जेटली यांना वैयक्तिक कामासाठी २ आठवड्यांच्या सुट्टीवर असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.

तसेच जेटली यांच्यावर सर्जरीचा निर्णय झाल्यास ती एक गुंतागुंतीची प्रक्रिया असणार आहे. जेटली यांच्यावर गेल्यावर्षी किडनी प्रत्यारोपण करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर नवीन सर्जरी करायचा निर्णय झाल्यास (केमोथेरपी) त्याचा ताण किडनीवर येऊ शकतो. किडनी प्रत्यारोपण केलेली प्रक्रिया अजूनही जेटलींच्या शरीराशी जुळू शकलेली नाही. गेल्यावर्षी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जेटलींची जबाबदारी सांभाळली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Oscars2022 : पत्नीवर केलेल्या ‘जोक’वर स्मिथने थेट सूत्रसंचालकाच्या कानशीलात लगावली, पुरस्कार मिळाल्यानंतर माफीनामा

Aprna

महागाई विरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचं डिजिटल आंदोलन, #मोदी_मतलब_महंगाई  हॅशटॅग होणार ट्रेंड 

News Desk

‘जबरदस्तीने तुम्हांला घरात बसवू ‘ तुकाराम मुंढेंचा नागपुरकरांना इशारा !

Arati More