नवी दिल्ली | कोरोनासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचा धक्कादायक खुलासा केला आहे. पराराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, परदेशातील २७६ भारतीयांना कोरोना बाधित आहेत. त्यापैकी एकट्या इराणमधील २५५ भारतीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. इराणपाठोपाठ दुबई १२ कोरोनाची बाधित भारतीयांची संख्या या दोन देशात जास्त असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे.
Ministry of External Affairs in a written reply to a question in Lok Sabha: 276 Indians are infected with #coronavirus abroad including 255 in Iran, 12 in UAE, 5 in Italy, and 1 each in Hong Kong, Kuwait, Rwanda, and Sri Lanka. pic.twitter.com/Hk1GjJoXyT
— ANI (@ANI) March 18, 2020
तसेच भारतात १४७ कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. भारतात महाराष्ट्र कोरोनाग्रस्तांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात ४२ कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. पराराष्ट्र मंत्रालयाने दिलेले माहितीनुसार, इराण २५५, इटली ५, दुबई १२ कुवेत, रवांडा, हॉगकॉग,आणि श्रीलंका यादेशात प्रत्येक १ कोरोना बाधित रुग्णांची संख्या असल्याची माहिती दिली आहे.
राज्यात अशी आहे कोरोना रुग्णांची स्थिती
- पुणे – ८
- पिंपरी-चिंचवड – १०
- मुंबई – ७
- नागपूर – ४
- यवतमाळ – ३
- कल्याण – ३
- नवी मुंबई – ३
- रायगड – १
- ठाणे – १
- अहमदनगर – १
- औरंगाबाद – १
देशातील १६ राज्यांमध्ये कोरोनाचे जाणून घ्या रुग्णांची सख्या
- महाराष्ट्र- ४२
- केरळ- २५
- उत्तर प्रदेश- १६
- हरियाणा- १६
- कर्नाटक- ११
- दिल्ली- १०
- लडाख- ८
- तेलंगणा- ५
- राजस्थान- ४
- जम्मू काश्मीर- ३
- ओदिशा- १
- पंजाब- १
- तामिळनाडू- १
- उत्तराखंड- १
- आंध्र प्रदेश- १
- पश्चिम बंगाल- १
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.