मुंबई | भारतीय रेल्वे मंत्र्यालयाने १ जूनपासून सुरू होणाऱ्या २०० ट्रेन्सची यादी जाहीर केली आहे. या ट्रेनसाठी आज ( २१ मे) सकाळी १० वाजल्यापासून हे बुकिंग सुरू होईल. तर स्थलांतरित मजुरांसाठी सुरू केलेल्या श्रमिक स्पेशल गाड्यांहून या ट्रेन वेगळ्या असतील. मात्र, ट्रेनच्या तिकिटांची बुकिंग ही केवळ IRCRC ची वेबसाइट किंवा मोबाईल अपवरूनच होईल. ३० दिवस आधी या गाड्यांसाठीचे आरक्षण करता येईल.
Ministry of Railways in consultation with Ministry of Health & Family Welfare (MoHFW) and Ministry of Home Affairs (MHA) has decided that train services on Indian Railways shall be further partially restored from 1st June 2020: Govt of India pic.twitter.com/PORsAO5u5N
— ANI (@ANI) May 20, 2020
दरम्यान, प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जाईल, आणि कोरोनाची लक्षण नसलेल्या व्यक्तिंनाच प्रवासाची परवानगी देण्यात येईल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या गाड्यांव्यतिरिक्त अन्य मेल/एक्सप्रेस, पॅसेंजर आणि सबअर्बन रेल्वे सेवा अजूनतरी सुरू होणार नाहीत. रेल्वेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार या ट्रेनमध्ये आरएसी आणि वेटिंग तिकिटे दिली जातील मात्र वेटिंग तिकटवाल्यांना ट्रेनमध्ये जाणाच्या परवानगी नाही.
Indian Railways has released the list of the 200 trains which will be operated from 1st June: Government of India pic.twitter.com/U1SmC4Bn8C
— ANI (@ANI) May 20, 2020
रेल्वे स्टेशनवरची हॉटेल्स, फुड स्टॉल्स, बुक स्टॉल्स उघडण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला आहे. ही दुकाने उघडण्यासाठी कार्यवाही सुरू करा असे आदेश रेल्वे विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पण हे करताना काही काळजी घेण्यासही सांगितले आहे.
संबंधित बातम्या
जाणून घ्या…मुंबई-पुण्यामधून कोणत्या राज्यासाठी धावणार रेल्वेच्या विशेष ट्रेन
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.