HW News Marathi
देश / विदेश

उन्नाव बलात्कार प्रकरण : आरोपी कुलदीप सिंह सेंगर यांची भाजपमधून हकालपट्टी

नवी दिल्ली | उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी कुलदीप सिंह सेंगर यांची अखेर भाजपकडून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती एएनआयने दिली आहे. परंतु, पक्षाकडून अधिकृत अशी कोणतीही माहिती किंवा पत्रक जाहीर केले नाही. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून उन्नाव बलात्‍कार प्रकरण आणि पीडितेच्या अपघाताचे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा अपघात झाल्यानंतर हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली जावू लागली होती. यानंतर भाजपवर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. त्यामुळे भाजपने सेंगर यांच्याविरोधात हे पाऊल उचल्याचे म्हटले जाते.

सीबीआयने ७ दिवसांच्या आत तपास पूर्ण करावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पीडितेच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या तीन पोलीस कर्मचारांना देखील निलंबित करण्यात असून उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्व खटले दिल्लीत चालवण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे. नोकरी मागण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर भाजपचे निलंबित आमदार सेंगर याने ४ जून २०१७ रोजी बलात्कार केल्याचा आरोप आहे. आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत पीडीत तरुणीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर प्रकरण प्रकाशझोतात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळच्या विकासासाठी केंद्रसरकार भरीव मदत करणार –  रामदास आठवले

News Desk

भाईगिरी नंतर डॅडी गांधीगिरीत अव्वल

News Desk

अटल बिहारी वाजपेयी पंचतत्त्वात विलीन, मुलगी नमिताने दिला मुखाग्नी

News Desk