HW News Marathi
देश / विदेश

आधुनिक’ जीवनशैलीमुळे घटतेय शुक्राणूंची संख्या

नवी दिल्ली- आधुनिक जीवनशैलीमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे. पाश्चिमात्य देशांत गेल्या ४०वर्षांत पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येत ६० टक्क्यांपर्यंत घट झाली असल्याचे एका संशोधनात सिद्ध झाले आहे.

‘ह्युमन रिप्रोडक्शन अपडेट’ नावाच्या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधनकर्त्यांनुसार इस्राएल, अमेरिका, डेन्मार्क, ब्राझील आणि स्पेन आदी देशांमधील पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या १९७१ ते २०११ दरम्यान ५९.३ टक्के घटली आहे. तर, युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशात शुक्राणूंच्या संख्येत ५२.४ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

यासाठी जीवनशैली, वातावरणातील बदल आणि आहार हे घटक कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कायम तणावात असणे, धुम्रपानाचे व्यसन हीसुद्धा यामागची काही कारणे आहेत. प्रमाणाबाहेर मद्य सेवन करणे, कॅफिन,सोयाबिन आणि बटाट्यांच्या अतिसेवनाचाही पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील देशांमध्ये अशाप्रकारचे संशोधन फार कमी झाले आहे. मात्र, या देशांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही समस्या निर्माण झाली नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचा निर्णय मंगळवारी होणार | सर्वोच्च न्यायालय

News Desk

मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर सर्वस्तरावरून टीकेचा वर्षाव

News Desk

राष्ट्रीय सुरक्षेबाबत ही बनवाबनवीच सुरू असेल तर काय करायचे? चीन घुसखोरीवरुन सेनेचा सवाल

News Desk