वर्धा | ‘मोदी देशवासीयांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही,’ असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली. राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या वतीने सेवाग्राम आश्रमात विविध कार्यक्रमातचे आयोजन करण्यात आले होते. राफेल डिलवरून पुन्हा एकदा मोदीं पुन्हा हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘मोदी चौकीदार नाही, तर राफेलमध्ये भागिदार आहेत.’
#WATCH: Congress Pres Rahul Gandhi says in Maharashtra's Wardha, "aapki aankh me aankh mila raha hoon na, kyoki mai aap se sach bol raha hu. Meri aankho mein dekhiye,Press waale acchi tarah dekhiye meri aankh aapke camera ka andar hain.Desh ki aankh mein aankh PM nahi mila paaye" pic.twitter.com/iSClj0n7cv
— ANI (@ANI) October 2, 2018
‘तसेच मोदीजी, तुमचे मित्र अनिल अंबानीजी आहेत, ज्यांना तुम्ही राफेल विमानांचा करार दिला, ज्यांच्या खिशात तुम्ही आपल्या देशातील माताभगिनींच्या खिशातले ३० हजार कोटी दिलेत. त्या अंबानींनी उभ्या आयुष्यात एकही विमान बनवले नाही,’ अशा शब्दात राहुल गांधींनी मोदीवर टीका केली.
Bola tha main PM nahi banna chahta, chowkidaari karna chahta hu. Modi Ji, aapne Gandhi Ji ke baare me article likha.Ab aap ek baat bata dijiye,ye jo apke mitra hai Ambani Ji jinke jeb me aapne Hindustan ka 30,000 cr rupay daala, btaiye aapne ye kaam kyo kiya: R Gandhi in Wardha pic.twitter.com/j0O6iZcIKZ
— ANI (@ANI) October 2, 2018
काँग्रेसने महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्ताने २०१९च्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण आणि गुलाम नबी आझाद आदी दिग्गज नेते सेवाग्राममध्ये उपस्थित होते. यावेळी काँग्रेसने भाजपमुक्तींचा नारा देण्यात पदयात्रा काढली. या पदयात्रेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.