नवी दिल्ली | भारतीय बँकांचे तब्बल ९ हजार कोटी थकवणाऱ्या मद्यसम्राट विजय माल्ल्याला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच देशातून पळून जाण्यासाठी मदत केली होती, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. यामुळेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. त्याचप्रमाणे अर्थमंत्री आणि मोदी सरकार खोटारडे आहे, अशीही टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.
The govt is lying on Rafale. The govt is lying on #VijayMallya. He was given a free passage out of the country by the Finance Minister: Congress President Rahul Gandhi pic.twitter.com/33stHMfnEy
— ANI (@ANI) September 13, 2018
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह मोदी सरकारवर देखील राहुल गांधी यांनी परखड टीका केली आहे. माल्ल्या देशातून पळून जाणार असल्याची कल्पना जेटली यांना होती तरीही अर्थमंत्र्यांनी याची माहिती सीबीआय, ईडी अथवा पोलिसांना दिली नाही. माल्ल्याला भारतात असताना अटक का केली नाही?, असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले. काँग्रेसने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
Even if he (Mallya) caught up with you in the corridor why did you not tell the CBI, ED that he's going to flee, catch him? This is clearly a collusion, there is definitely a deal. Finance Minister should clearly say what transpired and he should resign: Rahul Gandhi #VijayMallya pic.twitter.com/MSMdmYUwWL
— ANI (@ANI) September 13, 2018
अरुण जेटली आणि विजय माल्या यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये चर्चा करताना काँग्रसेचे नेते पीएल पुनिया यांनी पाहिले होते, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. “परदेशात जाण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती”, असे माल्ल्याने लंडनमध्ये वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना म्हटले होते. दरम्यान अरुण जेटली यांनी हे अमान्य केले आहे. त्याचप्रमाणे आमची भेट हि अधिकृत नव्हती असेही त्यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
यावेळी पीएल पुनिया म्हणाले, “विजय माल्ल्या हा संसदेमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी कोपऱ्यात जवळपास अर्धा तास बोलत होता. या बाबतीत मी अडीच वर्ष शांत होतो. विजय माल्ल्या आणि अरुण जेटली यांची भारत सोडण्यावरून चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. विजय माल्या भारत सोडून बाहेर जाण्यापूर्वी दोन दिवस ही भेट झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी विजय माल्ल्या भारताबाहेर पळून गेल्याचे वृत्तवाहिन्यांनी दाखविल्याने धक्का बसला. या भेटीचे रेकॉर्ड केंद्र सरकारकडे आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासावे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.