HW News Marathi
देश / विदेश

पाईनच्या तागापासून मोदी जॅकेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पोषाख हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मोदी यांच्या जॅकेटची स्टाईल आज तरुणाईमध्ये मोदी जॅकेट म्हणून लोकप्रिय आहे.

आता पुन्हा एकदा मोदींच्या जॅकेटवरून चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास पाइनच्या झाडाचे जे धागे असतात त्यापासून जॅकेट बनवले जाणार आहे. केंद्रीय कपडा राज्य मंत्री अजय टम्टा स्वत: पंतप्रधानांना हे जॅकेट भेट म्हणून देणार आहेत. या जॅकेटला नमोवस्त्र नाव देण्यात आल्याचे वृत्त आहे.

वर्षभरापूर्वी आम्ही पाइनच्या झाडाच्या लाकडातून धागे काढण्यास सुरुवात केली. आता त्यापासून कापड बनवण्यात येणार आहे, असे अजय टम्टा म्हणाले. यामुळे उत्तराखंडमध्ये कपडा उद्योग विकसित होऊ शकतो. भविष्यात इथल्या तरुणांना रोजगाराच्या शोधात दुस-या राज्यात जाण्याची गरज पडणार नाही असे उत्तराखंड सरकारमधील मंत्री सतपाल महाराज म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Amritsar : मृतांच्या परिवाराला ५ लाख रुपये सांत्वनपर मदत द्या !

Gauri Tilekar

…म्हणून भारताचा आर्थिक विकास वेग कमी झाला, रघुराम राजन यांची टीका

News Desk

मोदी-बायडेन यांची फोनवर झाली चर्चा!

News Desk