HW Marathi
देश / विदेश

राफेल करार घोटाळा लपविण्यासाठी मोदींनी फाईल जाळली असेल !

पुणे | “राफेल करार घोटाळा लपविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ती फाईल जाळली असेल”, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. हडपसर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेत ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी पुलवामा हल्ल्यावरून देखील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. “भाजप पुलवामा हल्ल्याचा राजकीय फायदा करून घेत आहेत. पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे श्रेय भाजप नेतेच लाटत आहेत”, असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला आहे.

“सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (६ मार्च) याचिकाकर्ते अ‍ॅड. प्रशांत भूषण यांना ‘द हिंदू’ या वृत्तपत्राच्या वृत्तांचा आधार घ्यावा लागला. न्यायालयाकडून याबाबत विचारणा झाल्यानंतर महाधिवक्त्यांनी राफेलची गोपनीय कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची माहिती दिली. राफेल करार घोटाळा लपविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ती फाईल जाळली असेल”, असा आरोप अजित पवार यांनी केला.

दरम्यान, ‘द हिंदू’ने संरक्षण मंत्रालयातील राफेल बाबतच्या या कागदपत्रांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचा गंभीर आरोप करत महाधिवक्त्यांनी राफेल कराराची कागदपत्रे चोरी होण्याला ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला जबाबदार ठरविले. यावेळी “कागदपत्रे चोरी झाल्यानंतर सरकारने काय पावले उचलली ?”, असा असा सवाल विचारत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी माधिवक्त्यांना सुनावले आहे.

 

Related posts

तेलंगणा विधानसभेच्या मतदानाला सुरुवात

News Desk

हार्दिक पंड्यांचे आक्षेपार्ह ट्विटबाबत स्पष्टीकरण

News Desk

इस्रोची अंतराळ भरारी ! भारतासह ८ देशांच्या ३० उपग्रहांचे महाउड्डाण

News Desk