HW News Marathi
देश / विदेश

INX Media Case : मोदी सरकार पी. चिदंबरम यांची बदमानी करत आहे !

नवी दिल्ली | “मोदी सरकार हे ईडी, सीबीआय आणि काही माध्यम समूहांना हाताशी धरून पी. चिदंबरम यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे”, असा आरोप करत माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांची पाठराखण केली आहे. “मी अशा पद्धतीने सत्तेच्या होणाऱ्या दुरुपयोगाचा तीव्र निषेध व्यक्त करतो”, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील या प्रकरणावरून केंद्र सरकारला टोला लगावला आहे. “सत्तेला सत्य चालत नाही”, अशी बोचरी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (२० ऑगस्ट) पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर, या प्रकरणी पी.चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तर सीबीआयकडून पी.चिदंबरम यांना लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याने त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पी.चिदंबरम यांना सरन्यायाधिशांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (२० ऑगस्ट) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर सीबीआयच्या हालचालींना वेग आला. सीबीआयची एक टीम मंगळवारी संध्याकाळी ६.३० वाजता पी.चिदंबरम यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर काही वेळाने ईडीची टीमही त्यांच्या घरी पोहोचली होती. मात्र, चिदंबर त्यावेळी घरी नव्हते. त्यानंतर, बुधवारी (२० ऑगस्ट) सकाळी पुन्हा सीबीआयची टीम चिदंबरम यांच्या घरी गेली. मात्र, आजही चिदंबरम घरी नव्हते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पातळी सोडून राहुल गांधींनी टिका करू नये-सुषमा स्वराज यांचे प्रत्युत्तर 

News Desk

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रामदास आठवले केरळ दौऱ्यावर

News Desk

एससी-एसटी कर्मचा-यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही | सर्वोच्च न्यायालय

swarit