HW News Marathi
देश / विदेश

मान्सून दक्षिण अंदमानमध्ये दाखल

मुंबई | मान्सूने शुक्रवारी दक्षिण अंदमानमध्ये हजेरी लावली. शुक्रवारी मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला आहे. तो लवकरच केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. केरळ नंतर मान्यून लवकरच कोकणमार्गे संपूर्ण महाराष्ट्रात प्रवेश करेल. गतवर्षी ३० मे रोजी मान्सूनने केरळात हजेरी लावली होती.

यंदा मान्सूनचे आगमन गतवर्षीच्या तुलनेत लवकर होण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील काही तासात मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागर परिसरात दाखल होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मान्सून श्रीलंकेत दाखल, येत्या ४८ तासात मुंबईसह राज्यभरात मान्सूनपूर्व सरी बरसणार

News Desk

गंगा बचावासाठी उपोषणाला बसलेल्या जेष्ठ पर्यावरणवादी स्वामी सानंद यांचे निधन

News Desk

Breaking News : चंदा कोचर यांचा बँकेच्या सीईओ पदाचा राजीनामा

swarit