HW News Marathi
देश / विदेश

आनंदवार्ता ! मान्सून केरळमध्ये दाखल

मुंबई । धामाच्या धारांपासुन मुक्त करणारा आणि आपल्या सहस्त्र धारांनी भीजवणारा पाऊस अखेर आलाय. मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पावसाचे केरळमध्ये आगमन झाले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाठी अनुकूल वातावरण तयार झाले होते. अखेर आज मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केला असल्याची अधिकृत माहीती हवामान विभागाने दीली आहे.

१८ आणि १९ मेच्या आसपास मान्सून अंदमान आणि आसपासच्या परिसरात स्थिरावला मात्र, पुढे त्याला पोषक वातावरण मिळाले नाही त्यामुळे मान्सूनची पुढील वाटचाल पुन्हा मंदावली. मात्र त्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र अंदमानच्या समुद्रात तयार झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून मान्सूनचा प्रवास केरळच्या दिशेने जोरदार सुरू झाला.

मान्सूनचे केरळमध्ये १ जूनला आगमन होत असते मात्र यंदा तब्बल आठ दीवस विलंबाने मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यामुळे शेतऱ्यांना मोठा दीलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि किनारपट्टीच्या भागात मान्सूनपुर्व सरी बरसत आहेत. अनेक ठिकाणी वादळवाऱ्यासह वाळीवाचा पाऊस बरसला. मात्र संपुर्ण देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता तो म्हणजे मान्सून अखेर दाखल झाला आहे. मात्र केरळमधील त्याचे लांबलेले आगमन पाहाता महाराष्ट्रातही मान्सून उशीरा पोहचणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. जवळपास १३ ते १५ जून च्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनसरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले

News Desk

“लवकरच ठाकरे सरकार कोसळणार…”, अमित शहांचे मोठे विधान

News Desk

शरद पवारांनी ९ ट्विट्स करत केंद्रीय कृषिमंत्र्यांना सुनावले!

News Desk