HW News Marathi
Covid-19

जगभरात ३० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण, अमेरिका, स्पेनसह इटलीमध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या

मुंबई | जगभरात ३० लाखांहून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळून आली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दोन ११ हजार ५३७ पुढे गेली आहे. तर आठ लाखांपेक्षा जास्त झाले बरे होऊन घरी गेले आहे. आतापर्यंत १८५ देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक ९ लाख ५४ हजार १८२ रुग्ण आढळले असून ५४ हजार ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जगात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या ही अमेरिके पाठोपाठ स्पेन आणि इटली जास्त आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत दोन लाख २९ हजार ४२२ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच २३ हजार ५११ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीत आतापर्यंत एक लाख ९९ हजार ४१४ रूग्ण आहेत. येथे आतापर्यंत २६ हजार ९७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात गेल्या २४ तासात १३९६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील रुग्णांचा आकडा आता २८ हजार पार गेला आहे. देशात आतापर्यंत ६ हजार १८४ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल (२७ एप्रिल) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी परळीसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार !

News Desk

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक!

News Desk

लॉकडाऊनचा निर्णय येत्या ८ दिवसांत होणार ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना काय इशारा दिला ?

News Desk